आपला समाज, आपले शेजारी यांचा विचार करायला शिकवणारं हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या, आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीनं पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे!

सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा, सभ्यता, शेजारधर्म हे सगळे गुण जेम आणि स्काऊटना त्यांच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये दिसतात आणि तेच प्रसंगी क्रूर, निष्ठुर, अमानुष होतानाही ते पाहतात. चांगुलपणाचा पराभव होताना पाहतात; पण दुष्टावाही जिंकत नाहीच, हेही त्यांच्या लक्षात येतं. या सगळ्याचा अर्थ लावायची त्यांची धडपड हेच त्यांचं मोठं होणं आहे. हार्पर लीचं श्रेष्ठत्व हे की, हे सूत्र ती कुठेच उघडपणे स्पष्ट करत नाही.......